कोपरगाव (प्रतिनिधी) गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पुरआला असून नदीकिनारच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यातील 24पैकी निम्मे धरण भरू लागल्यामुळे आता तेरा धरणांमधून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण मातीचे धरण असल्यामुळे त्यात 80 टक्के पेक्षा अधिक जलसाठा करणे धोकादायक ठरू शकते म्हणून 60 टक्क्यांवर पातळी नियंत्रित केली जाते आहे गंगापूर धरणासमोर मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे निफाड तालुक्यातील गोदावरी काठावर असलेल्या चांदोरी सायखेडा शिंगवे आणि करंजगाव या गावांना पुराचा फटका बसू नये विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा सहा वक्रकार गेटमधून विसर्ग करण्यात येत आहे आज सकाळ पर्यंत 22 टीएमसी पाण्याचा विसर्ग या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला आहे. कोपरगावातही गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकिनाराच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments