टाकळीभानमध्ये तरुणाई साकारतेय भरतीचे स्वप्न !खेळाच्या मैदानातून थेट सरकारी नोकरी मिळवणारे युवक ठरतायत प्रेरणादायी

दिलीप लोखंडे 

टाकळीभान (वार्ताहर)

 टाकळीभान गावात कबड्डीच्या माध्यमातून युवकांनी स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. खेळाच्या मैदानातून थेट पोलीस आणि सैन्य भरतीसारख्या कठीण प्रक्रियेत यश मिळवणारे हे युवक इतरांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. कोणताही वशिला, पैसा न वापरता केवळ मेहनतीच्या जोरावर मिळवलेली नोकरी हीच खरी विजयाची भावना घेऊन ते पुढे जात आहेत; परंतु दुसरीकडे, या होतकरू मुलांना शैक्षणिक सुविधांची कमतरता जाणवत आहे. वाचनालयाचा निधी गमावल्याचा मनस्ताप असून, हे दुहेरी वास्तव समाजासमोर अधोरेखित होते.

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान हे कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या गावातील युवक आता पोलीस, एसआरपीएफ, सीआरपीएफ, अग्निवीर अशा विविध भरतींसाठी तयारी करत आहेत. कबड्डीच्या मैदानावर वाढलेली ही पिढी आता भरतीपूर्व मैदानी सरावासाठी सकाळ-संध्याकाळ मैदानात घाम गाळत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळीभान गावातून आतापर्यंत जवळपास २०० युवक विविध सुरक्षा दलांमध्ये भरती झाले आहेत. या गावाला

कबड्डीचे माहेरघर म्हणून विशेष ओळख प्राप्त झाली आहे. खेळाच्या माध्यमातून राज्यपातळीवर ओळख निर्माण करणारे टाकळीभानचे सुपुत्र असलम इनामदार सध्या प्रो कबड्डीचा कॅप्टन आहे. शुमम पटारे यानेही प्रो-कबड्डीमध्ये आपला ठसा उमठवला आहे.
    तसेच राजेंद्र लोखंडे नॅशनल कबड्डीपटू झाले होते. अल्ताफ शेख, पीएसआय रावसाहेब लोखंडे, संदीप आघाडी, श्रीराम मैड, प्रशांत रणनवरे, बापूसाहेब साळवे, राजू पुंडे, वसीम इनामदार रवी बोडखे, गणेश इथापे, अशोक गाढे, महेश कचे, शिवाजी रणनवरे,मेजर, सुनील सोळाशे ,रावसाहेब बनकर, रामा मोरे,या सर्वांनी कबड्डी खेळाचे मैदान गाजवले असून, आज हे सर्वजण पोलीस व आर्मी खात्यात उच्च पदावर कार्यरत आहेत.
    गोरगरिबांना सरळ आणि पारदर्शक भरतीची संधी कबड्डीमुळे उपलब्ध होत आहे. बजरंग मंडळ टाकळीभानतर्फे शेतशाळेच्या मैदानात भरतीपूर्व सरावासाठी २०० ते ३०० युवक सकाळ-संध्याकाळ सराव करताना दिसून येतात. रनिंग, गोळाफेक, लांब उडी यांसारख्या कसरतींसह सामान्य ज्ञानाचे अध्ययन सुरू आहे. केवळ मैदानी सरावच नव्हे, तर लेखी परीक्षेची तयारीही जोमात सुरू आहे. तरुणांना अनिल पटारे सर,किरणराव धुमाळ, कबड्डी कोच रवी गाढे, राहुल कोकणे, संभाजी पटारे,महेश बडाख, अमोल चितळे मार्गदर्शन करीत असतात.

चौकट-
आत्मसन्मानासाठी झटणारे युवक

भरती प्रक्रिया पूर्णतः स्किलवर आधारित झाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील युवक आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात आहेत. टाकळीभानमधील युवक गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्ध सराव करत आहेत. ही केवळ नोकरीसाठीची धाव नाही, तर स्वतःच्या मेहनतीवर स्वाभिमानाने उभे राहण्याची जिद्द आहे.

चौकट-
वाचनालयाचा निधी गेला राजकारणाच्या फेऱ्यात,

टाकळीभान येथे आमदार सत्यजित तांबे यांनी ४५ लाखांचा निधी वाचनालयासाठी मंजूर केला होता; परंतु स्थानिक राजकीय नेत्यांच्या राजकारणामुळे ते वाचनालय अस्तित्वात आले नाही. परिणामी, गोरगरिब होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य सुविधा मिळाली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीला मोठा फटका बसला आहे. ही संधी गमावल्याने मुलांचे भवितव्य.

Post a Comment

0 Comments