संघार्षातुन शेतकर्यांचे हित जोपसणारे व्यक्तिमत्त्व -विठ्ठलराव शेळके

संघार्षातुन शेतकर्यांचे हित जोपसणारे व्यक्तिमत्त्व -विठ्ठलराव शेळके                                         


 शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी साहेब यांनी १९८० साली प्रदेशातील उच्च पदाची नोकरी सोडून महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे शेती विकत घेतली व त्या ठिकाणी अंगार मळा नाव देऊन घर बांधून शेती करण्यास सुरुवात केली शेती मध्ये वेगळे पिके घेण्यास सुरुवात केली..

 त्या पिका मध्ये काही शिल्लक राहत नाही हे लक्षात आल्यानंतर फुलशेती भाजीपाला व फळबागा यांची लागवड केली यात काही उरत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा याकरीता शेतकरी संघटनेची स्थापना केली यामध्ये नाशिक जिल्ह्यातील राजारामबापू पाटील हे प्रगतशील शेतकरी व आपल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील प्रगतशील शेतकरी भास्करराव बोरावके हे दोघे शरद जोशी साहेब यांना भेटले व शेतकरी संघटनेचे आम्हाला सभासद करा असी विनंती केली या दोन कार्यकर्तेना घेऊन पुर्ण महाराष्ट्र राज्यात जाऊन शेतकरी जाग्रुती करण्याचे काम सुरू केले मराठवाडा विदर्भ दोरे॔ केले व शेतकरी संघटनेचा एक कलमी कार्यक्रमाची सुरुवात केली शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा याकरीता सरकारकडे मागणी केली परंतु सरकार दुल॔क्ष करत आहे अस लक्षात आल्यानंतर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला व पहिले आंदोलन नासिक मुंबई महामार्ग रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यास राज्यातील हजोरो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी झाले हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी रोडवरून उठत नाही हे लक्षात आल्यानंतर गोळीबार करून १९ शेतकरी मारले गेले यावेळी प्रमुख कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली त्यावेळी शरद जोशी साहेब यांनी शपथ घेतली की आंदोलनात शाहिद झालेल्या शेतकरी बंधू यांच्या रक्ताचा आठवण म्हणून आम्ही छातीवर लाल बिल्ला लावून शेतकरी चळवळ उभी करु याच चळवळीतून महाराष्ट्रातील जिल्हामध्ये शेतकरी चळवळीची सुरुवात झाली यातूनच पूर्वीचा श्रीरामपुर तालुका आणि आता राहाता तालुक्यातील वाकडी येथील मान विठ्ठलराव पाटील शेळके हे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधारण शेतकरी परीवारात वडील कचरु मामा हे तळमळीचे शेतकरी अन्यायाचे विरूद्ध आवाज उठवणे हे गुण वडीलापासुनच मिळाले सुरूवाती पासून समाजसेवा,चळवळ यात विठ्ठलराव घडत गेले शेतकरी वर्गाचे कुठलेही आंदोलन असुद्या शेतकरी संघटनेचे नेते मान शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील राहुरी येथे ऊस उत्पादक शेतकरी यांची परीषद घेऊन ऊस दर वाढ आंदोलन, नासिक येथे कांदा आंदोलन,परभणी येथे तुर परीषद तसेच कोल्हापूर येथे दुध उत्पादक परीषद तसेच शेतकरी संघटना भक्कम करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन शेतकरी बंधू संघटीत व्हा असे शेतकरी संघटनेचे मेळावे आयोजित करण्यात आले होते साखरेवरील लेव्ही बंद करावी साखर कारखान्यामधील २५ कि मीटर अंतर काढून टाकून खाजगी कारखान्याला परवाने द्यावेत ऊसाला पहीली उच्चल एक रक्कमी द्यावी डिझेल पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रण करावे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा व स्वामीनाथन आयोग सी रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करून अधिक ५० टक्के नफा द्यावा संपुर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा विज बिल  माफ करून शेती पंपाना उच्च दाबाने विज पुरवठा करावा तसेच अतीवृष्टी दुष्काळ निधी व विमा रक्कम व शेती साठी बि बियाणे खते औषधे इतर सामुग्री यांन अनुदान द्यावे यासाठी २ अक्टोंबर १९९० साली देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र करून दिल्ली येथील बोट क्लब मैदानावर वरील मागण्या पुर्ण कराव्यात असे ठराव मंजूर करण्यात आले राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भेटून निवेदन देण्यात आले शेतकरी नादार झाला हे राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयात नादारी अर्ज दाखल करण्यात आले यामध्ये सर्वात जास्त अर्ज नगर कोर्टात दाखल झाले याबद्दल शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी साहेब यांनी मान विठ्ठलराव शेळके तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते यांचा पुणे येथील कार्यकारिणी बैठकीत सत्कार करण्यात आला कांदा आंदोलनात ऊस आंदोलनात दुध आंदोलनात तसेच शेतमालाला योग्य भाव मिळविण्यासाठी रस्ता रोको आंदोलनाचे जवळपास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील राज्य उपाध्यक्ष दिंवगत नेते बबनराव काळे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांच्या वर शेकडो गुन्हे दाखल असून आजही कोर्टात दावे चालू आहे २००९ साली ऊसाला पहिला हप्ता १८५० रुपये मिळवा यासाठी नगर जिल्ह्यातील राहाता येथील शारदा विद्यालय याठिकाणी शेतकरी संघटनेने देशातील ऊस उत्पादक शेतकरी परीषद घेऊन राज्यात ऊस आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यावर राज्य उपाध्यक्ष दिवंगत बबनराव काळे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके तसेच ऊस उत्पादक प्रमुख दिलीपराव इंगळे यांच्या वतीने मोर्चे काढले व एक रक्कमी पहीली उचल १८५० रुपये देण्यास भाग पाडले त्यावेळी मुंबई येथे साखर कारखानदार साखर आयुक्त मंत्रीमंडळातील कृषी मंत्री सहकारमंत्री शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक झाली यावेळी नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी खंडोबाची गावातील शेकडो कार्यकर्ते. स्पेशल बसचे नियोजन व साधनांचे नियोजन शेतकरी संघटनेचे सचिव रूपेंद्र काले यांनी केले शेतकरी बंधू यांना न्याय मिळवून दिला सरकार आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सध्याचे चित्र खुप विचित्र आहे शेती विषयी कुठलेही कार्य असुद्या पण त्याला आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही मान शरदराव जोशी यांनी उभी केलेली चळवळ आणि आमच्या विठ्ठलराव शेळके यांच्या सारखे असंख्य कार्यकर्ते आज शेतकरी प्रश्नावर लढा देत आहे मान विठ्ठलराव यांनी १९८६ साली शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावून आजपर्यंत शेतकरी संघटनेचे एकनिष्ठ कार्य. विठठलराव शेळके करत आहे ऊस प्रश्न,दुध उत्पादकांचा प्रश्न,कांद्याचा प्रश्न,कर्जमाफी,विजबिल माफी,पाटपाणी प्रश्न असे एक ना अनेक आंदोलने,निवेदने काय काय बोलावे पण सर्व प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा विठ्ठलरावाचे एक वैशिष्ट्य शासकीय काम असो की शेतकरी त्यांच्या कामात सातत्य हे कायम दिसून आले स्वखर्चातुन जिल्हाधिकारी कार्यालया पासून ते मंत्रालया पर्यंत खिशातून झळ खात विठ्ठलरावांनी शेतकरी प्रश्नांवरील पाठपुराव्याची ठिणगी विझवून दिली नाही अन्याया विरूद्धची मशाल स्वःत तर तेवत ठेवली परंतु शेतकर्यांच्या मुलांनाच्या मनातील निखारा देखील पेटत ठेवला या लढ्यामुळे अनेक शेतकर्याच्यां दिवाळ्या गोड झाल्या आज विठ्ठलराव शेळके हे ६० वर्ष पूर्ण करुन ६१ व्या वर्षात पदार्पन करत आहे विठ्ठलरावांचा ४० वर्षाचा संघटनेचा प्रवास अतिशय खडतर व संघर्षमय शेतकरी संघटना गावातच नाही तर प्रत्येकाच्या मनात रुजवली असंख्य कार्यकर्त्याची नाळ संघटनेशी जोडली गेली हक्काचे ते मिळवणारच या तत्वावर कार्य करत विठ्ठलराव आज पर्यंत चालले शेतकर्यासांठी आकाशाला गवसणी घालणारा पण मातीशी अतूट नात जपणारा हा सच्चा कार्यकर्ता आज त्यांचा जन्मदिन म्हणून काही आठवणीनां मुद्दाम उजाळा दिला अशा *संघर्षमय व्यक्तीमहत्वास जन्मदिनाच्या शुभेच्छा द्याव्यात तेवढ्या कमी तरी पण विठ्ठलराव आपणांस उदंड आयुष्याच्या असंख्य शुभेच्छा आपणांस दीर्घ आयुष्य व उत्तम उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा*🎂🎉🎊💐                                    शब्दाकंन- सतिश पानसरे (पत्रकार)

Post a Comment

0 Comments