आषाढी वारी निमित्त शाळेच्या वतीने बाळ दिंडी काढण्यात आली.


जिवन आनंदराव मावस
गंगापुर प्रतिनिधी


आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरी आषाढी एकादशी वारी निमित्त शाळेच्या वतीने बाल दिंडीचे आयोजन केले होते.
या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी, पायजमा, बंडी, धोतर या पोशाखात मुले तर रंगबिरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणाची साथ, ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा रुख्मीनीचा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले.
दिंडीत शाळेतील इयत्ता १ली ते ८ वी च्या बालवारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक आणि हुभेहुब वेशभूषा केल्याचं दिसून आहे.
दरम्यान,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना भक्तीचा संदेश दिला. चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी पाहण्याकरता ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. गावातून विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी शाळेच्या प्रांगणात आल्यावर प्रत्यक्ष वारीत ज्या प्रमाणे अश्वाचे गोल रिंगण केले जाते तसे गोल रिंगण आयोजित केले होते, या गोल रिंगणसोहळ्यात बाल वारकऱ्यांसमवेत शाळेतील शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ आणि पालकही धावले.
दिंडीत वारकरी जसे खेळ करतात तसे हुबेहूब खेळ खेळत होते. बाल वारकऱ्यांच्या या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता.
शेवटी बालवारकऱ्यांना खाऊ म्हणून लाडू वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments