दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी: येथील भूमिपुत्र शिवम सर्जेराव गायकवाड याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडुन घेतल्या गेलेल्या राज्यसेवा २०२३ या परीक्षेतून जिल्हा उपधिक्षक, राज्य उत्पादन (District Deputy Superintendent, State Excise) या पदी निवड झाली आहे. सन २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेत त्याने यश संपादन केले असून राज्यातून केवळ ४ पदे भरायची होती, त्यामध्ये शिवम गायकवाड याने स्थान मिळवले असून टाकळीभानची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे.
शिवमच्या बाल वयात आई-वडिलांचे निधन झाले, त्यामुळे शिवमच्या डोक्यावरीलआई वडिलांचे छत्र हरपले होते, त्याचा संभाळ काका मा, प्राचार्य खंडेराव गवांदे सर मावशी नंदा गवांदे व मावस भाऊअतुल गवांदे यांनी शिवमचा सांभाळ करून मायेची छाया दिली व शिक्षणाची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली,व यशस्वीपणे पार पाडली,
शिवमचे १ ते ४ थी प्राथमिक शिक्षण टाकळीभान जिल्हा परिषद शाळा, इयत्ता ५ वी ते १० वी माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान , ११ वी,१२ वी उच्च माध्यमिक शिक्षण बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, तर पुढील चार वर्ष डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे त्याने शिक्षण घेतले, तदनंतर २०२० पासून त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला व २०२१ मध्येच त्याची राज्य कर निरीक्षक, (State Tax Inspector) पदी निवड झाली. सध्या तो जीएसटी मुख्यालय मुंबई येथे कार्यरत आहे. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला आणि जिल्हा उपधिक्षक, राज्य उत्पादन (District Deputy Superintendent, State Excise) या पदाची परीक्षा २०२३ मध्ये तो उत्तीर्ण झाला व टाकळीभान गावामध्ये सर्वात उच्च अधिकारी होण्याचा मान त्याने मिळवला आहे ,
यासाठी त्याने अथक परिश्रम, चिकाटी, सातत्य व सदर यश मिळावण्याचा निश्चय केल्याने तो या यशापर्यंत पोहोचू शकला. त्यासाठी कोणतेही क्लास न लावता होम स्टडी वर जास्तीत जास्त भर देऊन व स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा त्यांने जास्तीत जास्त अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.व मा. प्राचार्य खंडेराव गवांदे सर (काका)व मावस भाऊ अतुल गवांदे, शिक्षण व मार्गदर्शन केले,यांच्यामुळे मी आज यशस्वी झालो आहे, त्यांचे ऋण मी कधीही फेडू शकत नाही, असे मनोगत शिवम व्यक्त केला आहे,
शिवाच्या यशाबद्दल गावात सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात आले आहे,व लवकरच शिवमचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात येणार आहे,
0 Comments