एसटी चालकाचा मुजोर पणा, भरस्त्यात एसटी केली उभी, वाहतुकीला अडथळा,कारवाई करणार कोण!




दिलीप शिंदे
सोयगाव दि.05 - सोयगाव बसस्थानकावर एसटी चालकाने मुजोरी करीत भररस्त्यावर एसटी उभी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सोयगाव बसस्थानकावर अस्तव्यस्त एसटी उभी करणाऱ्या चालकावर कारवाई करणार कोण! असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
       याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव आगाराची सोयगाव- देव्हारी एमएच-20-बीएल 2016 ही सकाळी 07:15 वाजता सोयगावहुन देव्हारी जाणारी बस दि.05 गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास देव्हारी जाण्यासाठी सोयगाव बसस्थानकावर आली असता बसचालकाने एका बाजूला बस उभी न करता मुजोरपणा करीत वाहतुकीला अडथळा निर्माण होईल याचे भान न ठेवता बसस्थानकावर रस्त्याच्या मध्येच बस उभी केल्याने दहा ते पंधरा मिनिटे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. याकडे आगारप्रमुखासह वाहतूक नियंत्रकाने लक्ष देणे गरजेचे आहे. भररस्त्यात बस उभी केलेल्या चालकास वाहतूक नियंत्रक कृष्णा मिसाळ यांनी कर्तव्याचे भान न ठेवता चालकास समज दिली नसल्याने बसचालकांकडून बसस्थानकासमोर अस्तव्यस्त बस गाड्या उभ्या करणे हे नित्याचे झाले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगारप्रमुख यांनी लक्ष घालून चालकांना समज द्यावी अशी चर्चा सोयगाव बसस्थानकावर सुरू होती. आगारप्रमुख काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments