जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंजनाई गो शाळेत नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांच्याहस्ते वृक्षारोपण--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.05 - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंजनाई गो शाळा आमखेडा ता.सोयगाव येथे  दि.05 गुरुवारी सोयगाव तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार तथा नगर पंचायत सोयगाव प्रभारी मुख्याधिकारी संभाजी देशमुख यांच्याहस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. 
        याबाबत सविस्तर माहिती अशी, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा ता.सोयगाव संचलित अंजनाई गो शाळा रावेरी शिवार घटोत्कच लेणी रस्ता आमखेडा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोयगाव तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार तथा सोयगाव नगर पंचायत प्रभारी मुख्याधिकारी संभाजी देशमुख, दीपक फुसे, संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे यांच्याहस्ते वड,बदाम,उंबर,लिंब,गुलमोहर,खारीक,चिंच आदींसह विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान संभाजी देशमुख यांनी गो शाळेची पाहणी करीत अध्यक्षांकडून सविस्तर माहिती घेतली. गो शाळेतील गो मातेचे संगोपन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ना.त. तथा सोयगाव नगर पंचायत प्रभारी मुख्याधिकारी संभाजी देशमुख व दीपक फुसे यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर गाडेकर, अनिल लोखंडे,अशोक ढगे,बापू ठाकरे भागवत दणके व रवि ठाकरे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments