बाभळेश्वर गाव ॲनिमियामुक्त करण्याचा संकल्पपोषण शिक्षण,अँनिमियामुक्त गाव उपक्रमात प्रमोद शिंदे यांचे प्रतिपादन



बाभळेश्वर (वार्ताहर) पोषण शिक्षण व "अँनिमियामुक्त गाव" उपक्रमासाठी राज्यातील ३४ ग्रामपंचायतीची निवड झाली असून, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर (ता. राहाता) येथील एकमेव ग्रामपंचायतची निवड झाली आहे. ॲनिमिया ही समस्या हद्दपार करायची असेल तर आहारात पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. 

अँनिमियामुळे माता मृत्यूमध्ये वाढ, कमी वजनाची बाळ जन्माला येत असून, संज्ञानात्मक विकास कमी होतो. शारीरिक विकास खुंटत रोग प्रतिकार शक्ती कमी होते. बुद्ध्यांक पाच ते दहा पॉईंट्सने कमी होत शारीरिक वाढ, आकलनक्षमता कमी होत असल्याचे प्रतिपादन "अँनिमियामुक्त गाव संकल्पने"चे मार्गदर्शक प्रमोद शिंदे यांनी केले. पुणे येथील यशदा प्रशिक्षण प्रबोधिनी, मुंबई येथील सहाय्यक ट्रस्ट व युवाग्राम विकास संस्थेच्या मार्गदर्शनात सोमवार (दिनांक २३) सकाळी ग्रामपंचायत सभागृहात "ॲनिमियामुक्त गाव संकल्पना" कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
 येथील ग्रामपंचायतीने ॲनिमयामुक्त गाव करण्याचा संकल्प केला आहे.  बाभळेश्वरच्या सरपंच संगीता शिंदे, ग्रामविकास अधिकारी रफिक शेख,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शिंदे, यशदाचे प्रा.प्रमोद शिंदे,युवाग्राम विकास संस्थेचे संचालक संभाजी पवार, आदित्य पवार, वैद्यकीय अधिकारी डाँ.विशाल सातपुते, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोरडे, उमेदचे तालुका व्यवस्थापक दिपक घुले, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या परिचारिका, बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होते. 
कार्यशाळेत पोषण आरोग्य, सेंद्रिय आहार, महिलांचे नेतृत्व आदी प्रमुख विषयावर चर्चा करण्यात आली. तथापि गाव अँनिमियामुक्त करण्याचा संकल्पही ग्रामपंचायत प्रशासनाने केला.
                                     ग्रामपंचायत घेईल पुढाकार 
ॲनिमियामुक्त गाव संकल्पना राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन यशस्वीपणे सहकार्य करेल अशी माहिती सरपंच संगीता श्रीकांत शिंदे यांनी दिली. यासाठी गावात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. लाल रक्तपेशी व हिमोग्लोबिन तयार करण्याची क्षमता जेव्हा एक किंवा अधिक पोषक द्रव्यांच्या अभावामुळे कमी होते. तेव्हा याला पोषणाच्या कमतरतेमुळे होणारा अँनिमिया म्हणतात. गावातील  ११ ते १८ वर्ष व १९ ते ४९ वयोगटातील मुली व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे.घरोघरी परसबागा करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असून,बचत गटामार्फत माँडेल गार्डन तर प्राथमिक आरोग्य केद्रांत आयुष गार्डन उभारणार आहोत.
 शिवाय आहारात शेवगा किती महत्त्वपूर्ण आहे. कढीपत्ता का वापरतात याचाही खुलासा करण्यात आला. यावेळी यशदाचे प्रा.प्रमोद शिंदे,युवाग्राम संस्थेचे संचालक संभाजी पवार  आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी राहता तालुका माजी सभापती बबलू पाटील म्हस्के उपसरपंच प्रमोद बनसोडे ग्रामपंचायत सदस्य अजित बेंद्रे पा .अमृत मोकाशी  केशरबाई माळी  श्रीकांत शिंदे पा पंचायत समिती अधिकारी राहता  ग्राम विकास अधिकारी रफिक शेख  जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक  कोरडे सर   सर व सर्व अशा अंगणवाडी सेविका आरोग्य अधिकारी बचत गट अध्यक्ष सचिव सीआरपी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments