शिर्डी (प्रतिनिधी)— धुळे जिल्ह्यातील चांदे गावचे रहिवासी सतीश रघुनाथ पाटील यांनी आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी केलेला नवस पूर्ण करत शिर्डीत नुकताच मोठ्या श्रद्धेने एक क्विंटल पेढ्यांचा नैवेद्य अर्पण केला. त्यांच्या या श्रद्धाभावाचे कौतुक करत श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सतीश पाटील यांची मुलगी काही काळापूर्वी अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिची दृष्टी गेली होती . तिला परत दृष्टी यावी अशी मोठ्या श्रद्धेने साईंना सतीश पाटील यांनी साकडे घालत नवस केला होता. त्यांच्या मुलीला हळूहळू दृष्टी आली. सतीश पाटील व परिवाराला मोठा आनंद झाला. सतीश पाटील यांनी सुरत ते शिर्डी अशी पाच वेळा पदयात्रा केली . त्यानंतरही ते दोनदा पदयात्रेत त्यांनी साईबाबांना एक क्विंटल पेढे वाटण्याचा नवस केला होता त्याप्रमाणे त्यांनी नुकताच श्री साई चरणी शिर्डीत येऊन साईबाबांना एक क्विंटल पेढे अर्पण करत मोठ्या श्रद्धेने आपला नवस पूर्ण केला व साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. साईं मुळेच माझ्या मुलीला दृष्टी मिळाली म्हणून आपण केलेला नवस पूर्ण केला अशी कृतज्ञतेची भावना सतीश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. या सत्कारामुळे ते आणखीनच भारवून गेले व ही सर्व साईबाबांची कृपा आहे असे त्यांनी म्हटले.
0 Comments