अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र राज्य रेडिओ श्रोता संमेलनाचे आयोजन....

दिलीप लोखंडे                                              

 टाकळीभान प्रतिनीधी - महाराष्ट्र राज्यातील रेडिओ श्रोत्यांसाठी १९ व २० ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या श्रोता संमेलनासाठी बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन या वर्षीचे  महाराष्ट्र राज्य रेडिओ श्रोता संम्मेलन अहिल्यानगर (अहमदनगर) येथे आयोजन करण्यात आले असुन या राज्य रेडिओ श्रोता संम्मेलन आयोजनाचा श्रीगणेशा डॉ श्रीकांत फड यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन बालांबीका देवी माता मंदीर सभागृह बालमटाकळी येथे श्रोत्यांच्या उपस्थीतीत करण्यात आला. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून श्रोते मंडळी उपस्थीत होते.  
                    यावेळी रेडिओ सम्मेलन बैठकीत मार्गदर्शन करतांना नावलौकीक श्रोतेमित्र डॉ, श्रीकांत फड म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये होणारे रेडिओ श्रोता सम्मेलन हे आदर्श व्हावे, अहिल्यानगरचेच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील श्रोता बन्धुंनी एकत्र येवुन संमेलन यशस्वीरीत्या पार पाडावे असे आव्हान यावेळी फड यांनी केले. यावेळी आदीनाथ अन्नदाते, राजेशकुमार साबळे, हरिभाऊ बिडवे, नंदकिशोर घटे, सुरेश जाधव,   अशोक, पाटील, रुकनोद्दीन तांबोळी, यांनी मनोगत व्यक्त केले.
                       यावेळी नावलौकीक श्रोतेमित्र डॉ.श्रीकांत फड,शिवदास गलांडे (परळी वैजनाथ), राजेश साबळे,रुकनुद्दीन तांबोळी, (संभाजीनगर), नंदकुमार घटे,धनंजय टऊळ (बीड), उस्मान शेख फौजी (हिप्परसोगा), अशोक पाटील (नेवासा), सय्यद जलालभाई (किल्ले धारूर),हरिभाऊ बिडवे (श्रीरामपूर), बिरजू परदेशी,राधाकिसन भिसे (बालम टाकळी), गोविंद पिसाळ (मांजरी), कैलास सदामत (पाथर्डी), ज्ञानदेव खेडकर (शिंगोरी, ता.शेवगाव), बाळासाहेब केसभट ( गायकवाड जळगाव), मंजुश्रीताई परदेशी (बालमटाकळी ) यांचेसह श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 
          

  याप्रसंगी सम्मेलन बैठकीत रेडिओ संम्मेलनासाठी स्वेच्छा निधी देण्याची घोषणा करण्यात आली त्यामध्ये संभाजीनगरचे श्रोतेमित्र राजेशकुमार साबळे, व पैठणचे सुरेश जाधव यांनी रोख रक्कम देत निधीचा श्रीगणेशा केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आहिल्यानगर आकाशवाणीचे आदीनाथ अन्नदाते यांनी तर आभार  बिरजु परदेशी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments