छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती टाकळीभान मध्ये मोठ्या उत्साहात साजरी,



दिलीप लोखंडे 
टाकळीभान  -प्रतिनिधी -   टाकळीभान येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा आज  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
        धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने टाकळीभान बस स्टँड समोर   सकाळी ठीक ९.०० वा. ह. भ. प. विश्वनाथगिरीजी महाराज  तसेच ह भ प संतोषजी महाराज चौधरी  यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून  पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली ‌
  यावेळी महिलावर्ग व ग्रामस्थ मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता .
          सायं ७.०० वा.युवाचार्य श्री संतोषजी महाराज आढावणे यांचा श्री छत्रपती शंभुराजे जीवनगाथा वर आधारीत किर्तनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथ केंद्र शाळा, टाकळीभान, या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments