दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.10-सोयगाव तालुक्यातील दोघांच्या खात्यावरील दोन लाख 52 हजार अवघ्या चार मिनिटात ओ टी पी न घेता गायब केल्याचा प्रकार दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी वरठाण आणि तितुर गावात घडला. याप्रकरणी दोघांनीही सायबर कडे तक्रारी केल्या आहे.
तालुक्यातील वरठाण येथील व्यापारी चेतन दिलीप जाधव यांना मो.न.7507101072 यावर दुपारी एक वाजुन 30 मिनिटांनी 9720507136 ह्या नंबर वरुन फोन आला होता की तुमच्या महाराष्ट्र बँक खाते ची केवायसी करायची आहे परंतु चेतन जाधव यांनी सांगितले की माझे खाते नाही तेव्हा समोरील व्यक्तीने चेतन दिलीप जाधव तुम्हीच आहेत ना असे सांगितले व काही वेळातच अवघ्या चार मिनिटात त्यांच्या खात्यातील दोन लाख 26 हजार रुपये गेले व त्यानंतर चेतनचा फोन वरील ईनकमिंग व आउटगोईग देखील बंद झाले याबाबत चेतन जाधव यांनी सायबर क्राईम कडे रीतसर तक्रार केली आहे याच वेळी तितुर येथील बापू अहिरे यांना तर चक्क कोणताही फोन न येता त्यांच्या खात्यातील 26 हजार पाचशे रु अचानक गायब झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईल वर येताच त्यांनी बँकेत धाव घेतली असता त्यांच्या खात्यातून अचानक 26 हजार 500 रु गेल्याचे कळले दरम्यान सोयगाव तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी सायबर भामट्यांनी दोघांना गंडा घातला आहे त्यामुळे तालुक्यात आता सायबर ठग ची एन्ट्री झाली आहे याप्रकरणी बापू अहिरे( तितुर) आणि चेतन जाधव वरठाण यांनी सायबर कडे तक्रारी केल्या आहे.
चौकट-दोन दिवसांपूर्वी ही बनोटी येथील येथील अमित सजन सोनवणे ह्या तरुणाने देखील सोशल मीडियावर गृपला आलेली लींक ओपन केली असता 71 हजार रुपये गेले आहे त्याने देखील सायबर क्राईम ला तक्रार केली आहे.
0 Comments