दिलीप शिंदे
सोयगाव दि.11-सोयगाव शहराला रविवारी दुपारी तीन वाजता चक्री वादळाने मोठा तडाखा दिला असून यामध्ये शहरातील वीस ते पंचवीस घरांवरील पत्रे उडाल्या मुळे शहरात दाणादाण उडाली होती. शहरात अर्ध्या तासाच्या वादळाने थैमान घालून सोयगाव शिवारात वादळाने वीस वीजपोल आडवी झाल्याची घटना घडली आहे.
शहरासह परिसरात चक्री वादळाने थैमान घालून तासभर अवकाळी पाऊस झाला यामध्ये शहरात मोठं नुकसान झाले. असून सोयगाव जरंडी रस्त्यावर झाडे कोसळून वीज तारा खाली कोसळल्या आहेत दरम्यान रविवारी दुपारी तीन वाजेपासून परिसरात वादळी वाऱ्याने अर्ध्या तास तडाखा दिला होता यामध्ये गलवाडा,आमखेडा,रावेरी,सोनस वाडी, वेताळवाडी, जरंडी या गावांना वादळ सह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे सोयगाव शहरात वादळाने धुमाकूळ घातला होता दरम्यान सोयगाव शिवारात चक्क महावितरण चे वीजपोल अर्ध्यातून तुटून कोसळले आहे वीस ते पंचवीस वीज पोल कोसळल्या मुळे महावितरणच्या पथकाने तातडीने वीज पोल युद्ध पातळीवर सरळ करण्याचे काम हाती घेतले होते दरम्यान वादळ मुळे अनेक झाडे आडवी पडून वीज तारा कोसळल्या आहे रस्त्यावर वीज तारा कोसळल्या मुळे वीज पुरवठा खंडित झाला होता शहरात वादळाने मोठा तडाखा दिला आहे
निंबायती जरंडी सह परिसरात रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा फटका बसला असून वादळी वाऱ्यात जरंडी शिवारातील गट क्र-311 मध्ये वादळी वाऱ्यात झाड मोटारसायकलवर कोसळून दोन मोटारसायकल दबल्या तर एक म्हैस जखमी झाली व तोसिफ शेख (वय 30) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहे त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे जरंडी, निंबायती परिसरातही वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला आहे..
0 Comments