बाभळेश्वर गोरखदादा गवारे
येथील पद्मश्री डॉ .विठठलराव एकनाथराव विखे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा सन 2003 च्या कला शाखेचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा (गेट टुगेदर ) प्रथमच मोठया उत्साहात साजरा झाला .
यावेळी सुंदर घोषवाक्य तयार केले होते .
" बालपणीचे सवंगडी घेऊन
आठवणीच्या फुलांचा दरवळ घेऊन
पुन्हा एकदा रंगु या जल्लोष ऋणानुबंधाचा ......
विद्यार्थी एकत्र जमले आणि शालेय जीवनातील आठवणी ना उजाळा देत एकमेकांना आलिंगन देत , मिठी देत 23 वर्षानंतर बदलेल्या चेहऱ्यानं कडे पहात स्नेह मेळाव्याला सुरुवात झाली.
आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फेटे बांधुन पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये सर्व दिवंगत विद्यार्थ्यांना तसेच पहलग्राम मध्ये मरण पावलेल्या आपल्या भावांन साठी भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - नंदू सदाफळ यांनी केले तर प्रास्तविक पावटे धनश्री मांडले
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी
माकोणे रावसाहेब, बारसे वैशाली , पुष्पा वाकडे ,भडांगे संतोष यांनी आपली मनोगत अतिशय उत्स्फुर्तपणे व्यक्त केले. कॉलेज जीवनातील आलेले अनुभव व तसेच प्रतिकुल परिस्थितीत त्यातुन घेतलेली शिकवण या बद्दल आपले विचार मांडण्यात आले.
यावेळी *शिक्षक - प्रा. बढे सर , प्रा. चौधरी सर , प्रा. साळवे सर , प्रा. डेंगळे सर* उपस्थित होते . त्यांचा सत्कार शाल व श्रीफळ देवून करण्यात आला.
आता सर्व मित्र, मैत्रिणी कोणत्या क्षेत्रात काम करतात, सध्या काय करता? कसे आहात ...असे अनेक प्रश्न विचारपूस करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या .
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नंदु सदाफळ , चंद्रकला निर्मळ, वैशाली बारसे, धनश्री पावटे, कल्पना निर्मळ, रावसाहेब माकोणे, संतोष भडांगे, सतीश साळुंके, सचिन म्हस्के, अविनाश चोळके यांनी केले कार्यक्रमाची पूर्वतयारी करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी मेहनत घेतली .
या कार्यक्रमाचे आभार भंडागे संतोष यांनी मानले
अतिशय खेळी मेळी च्या वातावरणात कार्यक्रम पार पडला .
मेळाव्या नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. आपण पुन्हा वेगळे होणार याचे भावनिक चित्र चेहाऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अतिशय जड अंःकरणाने सर्वांनी एकमेकांचा पुन्हा भेटू असे म्हणत निरोप घेतला . या कार्यक्रमा करता माजी विद्यार्थी अजित साळुंखे, सचिन रोकडे, प्रवीण रोकडे, सुनिल गुंजाळ, विजय टिळेकर, अनिता टिळेकर, आशा निर्मळ, कविता निर्मळ, शीतल चव्हाण, बेबी खोबरे, ज्योती उंडे, ज्ञानदेव थोरात, सुनील अंत्रे, अमोल म्हस्के, सचिन म्हस्के,सोमनाथ भालेराव, संदीप नाराळे, बादशाह घोरपडे, दादासाहेब म्हसे, दिनकर राऊत, संदीप वेताळ सहभागी झाले होते. .
0 Comments