बापरे..! सोयगावात एकाच ठिकाणी सर्पाची सोळा पिले,प्रभाग क्र.14 मधील नागरिकांमध्ये दहशत--


दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.10-सोयगाव शहरातील नारळीबाग भागात एकाच ठिकाणी एक-दोन नव्हे तर सापाची तब्बल सोळा पिले निघाल्याची घटना रविवारी घडली. यामुळे नारळी बाग परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ती पिल्ले अद्यापही गटारी ने मोकाट फिरत आहे त्यामुळे प्रभाग क्र-14 मध्ये दिवस भर दहशत होती संबंधित नगर पंचायत कडून त्या सर्पाच्या पिलांना पकडण्यासाठी कोणत्याही उपाय योजना केल्या नव्हत्या. मात्र, परिसरात अजून सापाची पिले असण्याची शक्यता नागरिकांनी  व्यक्त केली आहे.
    अवकाळी पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी सापांचे दर्शन होत आहे.सोयगाव शहरातील नारळीबाग भागात वॉर्ड क्र-14 मध्ये असलेल्या भागात एकाच वेळी 25 ते 30 पिले आढळून आली आहे यासंदर्भातील माहिती नागरिकांनी नगर पंचायतला दिली परंतु यावर उपाय योजनेसाठी सर्पमित्र यांना पाचारण करण्यात आले नाही त्यामुळे ही पिल्ले मोकाट होती त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी या सापाची शोध मोहीम हाती घेतली यामध्ये 16 पिल्ले आढळुन आली मात्र, पिलांची संख्या जास्त असू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार शेजारी पाजारीना लक्ष ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे.
दरम्यान नारळीबाग परिसरात वॉर्ड-14 मध्ये नाली असल्याने कचरा व घाण साचली असून सापांना लपण्यासाठी सोईस्कर आहे. त्यामुळे त्याठिकाणी एवढे पिले आढळून आले. परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे..
----नागरिकांनी काळजी घ्यावी
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी सर्पदर्शन घडत आहे. यामुळे नागरिकांनी विनाकारण घरात अडगळीच्या ठिकाणी कचरा किंवा इतरसाहित्य ठेवू नका. अशा ठिकाणी साप आपला निवारा करतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सोयगाव चे सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी केले आहे.
---गल्ली बोळात सापाचीच चर्चा
शहरातील नारळी बाग भागात रविवारी गल्ली बोळात सापांचीच चर्चा सुरू होती गटारी तुन वॉर्ड भर या सापाची भ्रमंती सुरू आहे त्यामुळे इथे दिसला, तेथे दिसला अशीच चर्चा या वॉर्डात सुरू आहे. काही साप नालीमध्ये पळून जात आहेत .
(बातमीदार दिलीप शिंदे)

Post a Comment

0 Comments