टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथील वाचनालय इमारतीचे काम ठेकेदाराच्या आडमुठे भूमिकेमुळे रेंगाळले असून तातडीने इमारतीचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे केली आहे. आ. सत्यजित तांबे यांच्या निधीतून टाकळीभान गावासाठी वाचनालय मंजूर झाले आहे.
ठेकदाराच्या आठमुठे धोरणामुळे वाचनालय इमारतीचे बांधकाम रेंगाळले आहे. ग्रामपंचायतीने ठेकेदाराशी अनेकदा चर्चा केली, मात्र काम करण्यास परवडत नसल्याचे कारण देत ठेकेदार टाळाटाळ करत आहे. ठेकेदारास काम करण्याचे आदेश द्यावेत किंवा दुसऱ्या ठेकेदारास हे काम द्यावे, अशी मागणी टाकळीभान ग्रामपंचायतीने केली आहे.
येणाऱ्या अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने लेखी व तोंडी मदत करण्याचे आश्वासन बांधकाम ठेकेदार कृष्णा शिंदे यांना दिले. मात्र ऑनलाईन निविदा अंदाजपत्रक दराच्या २२ टक्के कमी दराने घेतल्याने काम करण्यास परवडत नसल्याचे उत्तर देत ठेकेदार बांधकामास ते टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती करून त्यांच्याकडून तातडीने काम सुरू करण्याची मागणी उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांनी केली आहे. ठेकेदाराच्या आडमुठे भूमिकेमुळे गाव विकास खुंटत असून बांधकाम विभागाने तातडीने काम सुरू करावे, अन्यथा उफोषणाचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments