गोठ्याला आग,मका व जनावरांच्या चाऱ्यासह गोठा जळून खाक, सोयगाव तालुक्यातील रामपुरा शिवारातील घटना---



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.16-तालुक्यातील निंबायती(रामपुरा) शिवारातील शेतातील गोठ्यात अज्ञातांनी मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास आग लावल्या ची घटना रात्री एक वाजता उघडकीस आली दरम्यान या आगीच्या घटनेत शेतातील कापणी करून ठेवलेल्या मक्याची गंजी,जनावरांचा चारा,गोठ्याची पंचवीस पत्रे,ठिबक ची बंडल आदी वस्तू जळून खाक झाल्या असून अंदाजे तीन लाख रु चे नुकसान झाले आहे .

याप्रकरणी अद्यापही महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला नाही 
इंदुबाई रतन राठोड यांच्या शेतातील गोठा ला अज्ञातांनी आग लावून  (निंबायती)रामपुरा शिवार मधील गट नंबर 45 शेतामधील मकाचा गंज जनावराचा चारा वीस ते पंचवीस पत्रे व ठिबक बंडल जळून खाक झाले
अंदाजे ३ लाख रुपये पर्यंत नुकसान झालेले आहे.दरम्यान घटनेची आगीची माहिती मिळताच गावातून वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु आगीची आक्रमकता अधिक असल्याने आग नियंत्रणात न येता,आगीने शेतात प्रवेश करून शेतातील जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे दरम्यान गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे परंतु दैव बलवत्तर होते म्हणून गोठयात असलेली जनावरे एक म्हैस, व दोन बैल बाहेर बांधलेली होती त्यामुळे ही जनावरे वाचली आहे. याप्रकरणी शेतकरी इंदूबाई राठोड यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून सोयगाव पोलिसांनी घटनेची नोंद करण्यात आली असून तहसील कार्यालयात नुकसान भरपाई साठी निवेदन देण्यात आले आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments