सोयगाव-सिल्लोड तालुक्याचे युवा नेते राहुल राठोड यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.16- सोयगाव तालुक्यातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे व युवकांचा आधारस्तंभ म्हणून उदयास आलेले युवा नेतृत्व व  नुकतेच सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत तिसऱ्या क्रमांकाचे मते घेतलेले राहुल राठोड त्यांचे सहकारी अमर राठोड व अरविंद राठोड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

 या प्रसंगी मंत्री अतुल सावे, राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड, आमदार नारायण कुचे, आमदार सौ. अनुराधा चव्हाण, आमदार संजय केनेकर, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, सिल्लोड सोयगाव विधानसभा प्रमुख सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पुष्पाताई काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments