सोयगाव भाजप तालुका अध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड--



दिलीप शिंदे सोयगाव 
सोयगाव दि.20- सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायत चे उपसरपंच संजय पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या सोयगाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोयगाव शहरात भाजपची निवड प्रक्रिया पक्ष निरीक्षक कल्याण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तालुकाध्यक्ष पदासाठी पाच जण इच्छुक होते.

 पाच जणांच्या मुलाखती घेतल्यानंतर पक्ष निरीक्षक कल्याण गायकवाड यांनी संजय पाटील यांची सोयगाव भाजपा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली. या बैठकीत प्रथम मावळते तालुका अध्यक्ष बद्री राठोड, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, माजी सरपंच वसंत बनकर, राजेंद्र जावळे, शहराध्यक्ष योगेश पाटील, मोतीलाल वाघ, संजय मडवे, राहुल राठोड व निरीक्षक कल्याण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. 
  यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष संजय पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी निरीक्षक कल्याण गायकवाड, तालुका अध्यक्ष बद्री राठोड, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, माजी सरपंच वसंत बनकर, शहराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक राजेंद्र जावळे, मोतीलाल वाघ, सुनील गावंडे, संजय तायडे, संजय मंडवे, गजानन शिरसाट, मयूर मनगटे, मधुकर पाटील, अमृत राठोड, साधूंनाथ राठोड, राहुल राठोड, भीवा चौहान, संजीवन सोनावणे, दत्तू ढगे ,  समाधान आगे, सुनील ठोंबरे, शंकर कोथलकर, संजय आगे  ,संजय चौधरी, अमृत राठोड आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments