राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहपरिवार घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शनिवारी सहपरिवार शिर्डीला भेट देऊन श्री साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. 
साई दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी त्यांचा श्री साई मूर्ती शाल देऊन सत्कार केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे- सिनारे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते. नामदार चंद्रशेखर बावनकुळे शिर्डीत आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. विविध विषयावर चर्चा केली.

Post a Comment

0 Comments