लोहगाव (वार्ताहर) : राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे तंत्रशिक्षण विभागातील शिक्षक प्रकाश गोटीराम गहिरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अरुण कडू पाटील व जनरल बॉडी सदस्य माजी प्राचार्य भीमराव आंधळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. यावेळी शाखेच्या वतीने व रयत बँक शाखा श्रीरामपूर यांच्या वतीने प्रकाश गहिरे यांचा प्राचार्य मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, रयत बँकेचे व्हाईस चेअरमन उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय ठाकरे, शुभांगी गहिरे, नामदेव गहिरे, शिवाजी बेंद्रे, डॉ. वैशाली म्हस्के, राजेंद्रकुमार क्षिरसागर, माजी प्राचार्य मधुकर अनाप, माजी विभागीय अधिकारी अण्णासाहेब साबळे, स्वप्नील गहिरे, शितल गहिरे, सत्कारमूर्ती प्रकाश गहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश गहिरे यांनी माध्यमिक मुले विभागास व कन्या विभागास प्रत्येकी अकरा हजार रुपये देणगी दिली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी शिवाजी बेंद्रे यांनी कन्या विद्यालयात इयत्ता दहावी वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस बक्षीसापोटी पन्नास हजार रुपये ठेवीची रक्कम मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी रावसाहेब म्हस्के व उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी उभयतांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्याध्यापक हरिभाऊ चौधरी, मुख्याध्यापक लक्ष्मण रक्टे, ॲड. राजेश नाईक, तुकाराम जाधव, केशव म्हस्के, कृष्णा गहिरे, चंदूभाई तांबोळी, माजी उपप्राचार्य अलका मते, पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे, पर्यवेक्षक सुभाष भुसाळ, विस्ताराधिकारी अण्णासाहेब गहिरे, योगेश कहार, संदीप लहिरे, संतोष पऱ्हे, मोहिनी म्हस्के, किरण गव्हाणे, श्याम पऱ्हे, प्रल्हाद गहिरे, मयूर गहिरे, अश्विनी गहिरे, देवेश आहेर, धनंजय भोसले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक मित्रवर्ग, नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, अश्विनी सोहोनी व रेणुका वरपे यांनी केले तर शेवटी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी आभार मानले.
0 Comments