घुमनदेव येथे युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील घूमनदेव येथील एक महिला घरात एकटीच असता घरासमोर राहणारा भैरव भाऊसाहेब कांगुणे या युवकाने महिलेस मिठी मारून तू मला फार आवडतेस असे म्हणत  लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले भैरव कांगुणे याच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       घुमनदेव येथील महिलेने समक्ष श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर होवुन लेखी फिर्याद देते की, मी वरील ठिकाणी आई , मुलगी   एकत्र राहतो व शेती व्यवसाय करतो. माझे पति जनार्दन हे 12 वर्षापुर्वी मयत झालेत आहे. आमचे घराशेजारी भैरव भाउसाहेब कांगुणे हा त्याचे कुंटुबासह राहतो. तो नेहमी माझ्याकडे वाईट नजरेने बघत असतो.
दि 25/04/2025 रोजी सायंकाळी 05.30 वा माझी मुलगी  व आई  भोकर येथे दवाखान्यात गेल्या होत्या. तेव्हा मी घरी एकटीच होते. त्यानंतर सायंकाळी 07.30 वा चे सुमासास मी घरात एकटी असताना आमचे घराशेजारी राहणारा भैरव भाउसाहेब कांगुणे हा घरासमोर आला व मला आवाज दिल् त्यावेळी मी घराबाहेर आले असता त्याने घरातील बाकीचे कुठे गेले असे म्हणाला असता मी त्यांना ते दवाखान्यात गेलेले आहेत, असे सांगितले. त्यावेळी त्याने तु मला फार आवडते असे म्हणुन माझा डावा हात धरुन मला मिठी मारुन मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यावेळी मला सोडा असे म्हणुन आरडा ओरड करु लागले असता त्याने तु जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देवुन वाईट वाईट शिवीगाळ केली व तो तेथुन निघुन गेला. त्यानंतर मी खुप घाबरलेली असल्याने सदर घडला प्रकार मुलीला सांगितला. त्यानंतर मी व माझी मुलगी, भैरव भाउसाहेब कांगुणे याचेविरुद्ध तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपी कांगुणे यांचे विरोधात भा. न्या. सं. कलम, (बी. एन. एस.),2023, 74,  352, 351(2), 351(3), नुसार  श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल हे करीत आहे ,

Post a Comment

0 Comments