दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी: समाजातील इतर कार्यक्रम, मंदिरे व इतर घटकांच्या देणगी बरोबरच समाजातील उदार व्यक्तिमत्त्वांनी शाळा, अभ्यासिका केंद्र यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सत्कार्यासठी देखील इच्छुकांनी दान द्यावे असे प्रतिपादन प्रा. दिलीप कोकणे यांनी व्हिज्युअल अभ्यासिका केंद्रच्या शासकीय सेवेच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.कार्लस साठे सर होते.
प्रा. कोकणे पुढे म्हणाले की या ठिकाणी व्हिज्युअल अभ्यासिका केंद्रामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी खरे जिवंत देव असून त्यांना अभ्यासिकेच्या सोयी सुविधेसाठी मदतीची खरी गरज आहे. अशा अभ्यासिका केंद्र, शाळा यांना मदतीसाठी गावातील दानशूर यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी धर्मदाय आयुक्त कार्यालय मध्ये क्लर्कपदी शासकीय सेवेत निवड झालेले विलास इथापे, संभाजीनगर पोलीस सेवे मध्ये निवड झालेले सोपान बनकर, शासकीय आर्मी सेवेत अग्निवीर पदी निवड झालेले विशाल रणनवरे, शासकीय आर्मी सेवेत अग्निवीर
पदी निवड झालेली योगेश पटारे आदी यशस्वी विद्यार्थ्यांचा गावातील मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा श्रीधर गाडे मित्र मंडळ यांच्या वतीने ही सत्कार करण्यात आला. .व त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रा.कार्लस साठे सर म्हणाले की या अभ्यास केंद्रामध्ये सुरुवाती पासून आतापर्यंत १८ विद्यार्थी अद्याप पर्यंत शासकीय सेवेत भरती होऊन यशस्वी झाले असून अभ्यासिका केंद्राचं मोठे यश आहे. गावातील दानशूर यांनी अशा अभ्यासिका केंद्रासाठी मदत करावी या ठिकाणी पुढच्या अनेक पिढ्या घडणार आहेत. आपल्याच परिसरातील व गावातील विद्यार्थी यशस्वी होत असून यामुळे आपल्या भागाची प्रगती व विकास होणार आहे. यावेळी अनिल पटारे व प्रा. दिलीप कोकणे यांनी या अभ्यासिका केंद्रासाठी मदत दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच व्हिज्युअल अभ्यासिका केंद्र संचालक महेश शिंदे व प्रशांत जाधव यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे,,पो. कॉ गणेश इथापे, बाबासाहेब लोखंडे किशोर शिंदे सर, पालक रणनवरे, सुनील दाभाडे,अशोक शेंडे , आदीसह व्हिज्युअल अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले. तर आभार महेश शिंदे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व्हिज्युअल अभ्यासका केंद्र व ग्रामस्थ टाकळीभान यांच्या वतीने करण्यात आले होते.
0 Comments