लोहगाव ( वार्ताहर)
येडूआई गडावरच जत्रा भरनार, आदिवासींच्या सहनसीलतेचा अंत पाहु नका- ज्ञानेश्वर अहिरे
शेकडो वर्षांपासून ज्या ठिकाणी येडूआई गडावर ज्या ठिकाणी जत्रा भरते त्याच ठिकाणी जत्रा भरनार व कंदुरी साठी येणारे भाविक येडूआई गडावरच थांबतील पिंपळदरी ग्रामपंचायतीने आदिवासींच्या सहनसीलतेचा अंत पाहू नये अन्यथा आदिवासींच्या भावनांचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही असा ईशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
श्री.अहिरे यांनी म्हटले आहे की,पिंपळदरी ग्रामपंचायत,येडूआई देवस्थान,व तेथील विविध कार्यकारी सोसायटी यांनी एक संयुक्त संदेश शोषल मिडीयावर टाकला आहे.त्या मध्ये त्यांनी नियोजित घारगाव ते येडूआई गड हा सोपा मार्ग बदलून घारगाव ते कोठा,कोठा ते वणकुटे मार्गे जांभळदरा,पिंपळदरी असा अतीशय किचकट मार्ग बदलला आहे.तसेच ज्या येडुआई गडाच्या पायथ्याशी कंदुरी साठी तंबू लावून आदिवासी रात्रभर वास्तव्य करतात ते ठिकाण बदलून पिंपळदरी गावाजवळ तंबू लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.हे दोन्ही निर्णय भिल्ल समाजाला मान्य नाही.कारण गेल्या शेकडो वर्षांपासून येडूआई गडावरच जत्रा भरत आहे,व गडाच्या पायथ्याशी कंदुरी साठी येणारे भाविक मुक्काम करतात.त्या मुळे ग्रामपंचायतीने त्यांचा निर्णय आमच्यावर लादन्याचा प्रयत्न करू नये.जत्रा या मागे ज्या ठिकाणी येडूआई गडावर भरत होती त्याच ठिकाणी भरनार आहे.कोन्हीही आदिवासींच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, आम्ही शांत आहोत आम्हाला शांतच राहू द्या . आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आदिवासींच्या सहनसीलतेचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
0 Comments