रांजणगाव गणपती येथे साहित्य निर्मिती गौरव पुरस्कार सोहळा.




पुणे प्रतिनिधी विवेकानंद फंड 

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण च्या वतीने येत्या रविवारी रांजणगाव गणपती येथे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कवी मनोहर परदेशी यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकूण दहा उत्कृष्ट साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे .
यामध्ये कथा, कांदबरी, कविता, बालसाहित्य, ललित या विभागात लेखन केलेल्या उत्कृष्ट साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये दिपक तांबोळी, लक्ष्मण दिवटे, दत्ता पाटील, कमलाकर राऊत, बाळकृष्ण बाचल, उत्तम सदाकाळ, गणेश भाकरे, प्रकाश बोधे,सुभा लोंढे, अलकनंदा घुगे, इत्यादी लेखकांचा सन्मान चिन्ह,रोख रक्कम,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे तसेच शिरूर तालुक्यातील पाच साहित्यिकांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष कुंडलिक कदम यांनी सांगितले यामध्ये, संभाजी शिवलें, शंकर न-हे, दत्तात्रय जगताप, दादाभाऊ गावडे, रुपाली भोरकडे या पाच साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  मांडवगण फराटा येथील प्रसिद्ध कावीळ तज्ञ डॉ.धनंजय शिंदे हे असणार आहेत तर पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ प्रबोधनकार उत्तम आण्णा भोंडवे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ संदीप सांगळे हे लाभलेले आहेत.. सकाळी साडे अकरा वाजता ग्रंथ पुजनाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याचे मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर यांनी सांगितले तर जास्तीत जास्त साहित्यिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे प्रमुख कार्यवाह विवेकानंद फंड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments