लोहगाव (वार्ताहर) : प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस व सारखी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
राज्य पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या एनएमएमएस व सारथी या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी नैतिक दीपक सोनवणे व शुभम सुरेश साळवे यांनी एनएमएमएस या परीक्षेत तर सारथी परीक्षेत सिद्धार्थ सोमनाथ राऊत व पार्थ प्रदीप घोगरे यांनी यश संपादन केले आहे. तर कन्या विद्यालयातील एनएमएमएस या परीक्षेसाठी एकूण ३३ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. पैकी ११ विद्यार्थिनी या परीक्षेत पात्र झाल्या असून सारथी शिष्यवृत्तीसाठी सिद्धी बाळासाहेब गोडसे व दिव्या नवनाथ बोराडे या विद्यार्थिनी पात्र झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ९६०० इतकी शिष्यवृत्ती चार वर्षाकरिता मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, उपप्राचार्य अलका आहेर, संजय ठाकरे, माधुरी वडघुले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रियंका भालेराव, कदम व्ही.पी., चाबुकस्वार एस. यु., ठाकरे एस. एन., तानाजी सदगीर, रेणुका वर्पे, नरेंद्र ठाकरे, अनिल जाधव आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments