शिर्डी ( प्रतिनिधी) .
(राजकुमार गडकरी ) शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सवा करिता विविध भागातून दरवर्षी मोठया प्रमाणात पालख्या शिर्डीत दाखल होत असतात. यावर्षी श्रीरामनवमी उत्सवा करीता विविध ठिकाणाहून शिर्डी कडे साई पालखी व पदयात्री मोठ्या संख्येने येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पायी येणाऱ्या साई पदयात्रांची संख्या मोठी आहे. मुंबई उपनगर व ठाणा कल्याण नाशिक अधिभागातून येणाऱ्या पदयात्री मोठ्या संख्येने शिर्डी कडे श्रीराम नवमी साठी येत असून अनेक साई पालख्या सिन्नर पर्यंत आले आहेत. या शिर्डी कडे येणाऱ्या अनेक पालख्यांचे व साई पदयात्रींचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, यांनी सिन्नर येथे जावून स्वागत केले व पालख्यां सोबत काही अंतर पायी चालून सहभाग घेतला. साईपालखी. धारकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालखीधारकांनी समाधान व्यक्त केले.
साईपालखी धारकांकरीता संस्थान तर्फे विविध ठिकाणी पालखी थांब्यांवर करण्यात आलेल्या मंडप, पिण्याचे पाणी, टॉयलेट व्हॅन, एलईडी व्हॅन, भजन किर्तन कार्यक्रम इत्यादी व्यवस्थेची पाहणी केली तसेच तेथील कर्मचा-यांना पालखी मध्ये आलेल्या साईभक्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेणे बाबत सुचना दिल्या.
यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख अनिल शिंदे, वाहन विभागप्रमुख अतुल वाघ, नवनाथ मते आदी उपस्थित होते. सध्या श्रीराम नवमी साठी शिर्डीला येणाऱ्या अनेक साई पालख्या व पदयात्रेंमुळे शिर्डीला येणारे रस्ते साई भक्तांनी व साई नामाने गजबजून गेले आहेत.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments