शिर्डी साईनाथ हॉस्पिटल मध्ये दुसरी नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी! रुग्णाला मिळाली नवी दृष्टी!

शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी येथे नेत्र पेढी सुरू झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील भगवान अण्णा तळेकर यांच्यावर श्री साईनाथ हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन दृष्टी देण्यात आली आहे.

 ही नेत्र पेढी सुरू झाल्यानंतर  ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. या अगोदर अकोले येथील एका महिलेवर शस्त्रक्रिया करून तिला दृष्टी देण्यात आली होती. एखाद्या अंध व्यक्तीला या सृष्टीचा आनंद घेणे अवघड असते. मात्र आता विज्ञानाने ते शक्य केले असून ज्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे .त्यांची शस्त्रक्रिया करून इतरांना त्यांचे नेत्र बसवून नवी दृष्टी देण्याचे काम या नेत्र पिढीकडून होत आहे. ही खरोखरच कौतुकास्पद बाब असून येथील नेत्र पेढीचे डॉक्टर अशोक गाविंत्रे व सर्व वैद्यकीय अधिकारी व स्टॉप चे सर्व क्षेत्रांमधून मोठे कौतुक होत आहे. ज्यांना नवी दृष्टी मिळाली आहे ते मोठे समाधानी असून साईबाबांच्या कृपेनेच आम्ही हे जग पाहू शकलो असे ते म्हणत आहेत. त्यामुळेच मरणोत्तर नेत्रदान करणे ही आजच्या काळाची गरज आहे .असेही आता म्हटले जात आहे.

Post a Comment

0 Comments