टाकळीभान प्रतिनिधी - टाकळीभान येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ११ रोजी रात्रभर भजन करण्यात आले.
सकाळी मूर्तीस गंगाजलाने स्नान घालून अभिषेक करण्यात आला व श्रीराम जोशी यांनी विधीवत पूजा केली. पूजेनंतर ६.३० वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करून आरती करण्यात आली. जन्मोत्सवाप्रसंगी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. जन्मोत्सव होताच उपस्थित भावाकांनी जय श्रीराम, जय हनुमान असा जयघोष केला. हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमानाचे दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती.
0 Comments