पत्रकार प्रकाश औताडे . बाभळेश्वर
..बाभळेश्वर (वार्ताहर ) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील जागृत ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यात्रेचे आयोजन शुक्रवार दि. १८ एप्रिल व शनिवार दि. १९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे .शुक्रवार सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र पुणतांबा येथून गावातील युवकांनी आणलेल्या कावडीच्या पाण्याची मिरवणूक तसेच मानाच्या काठीची मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे त्यानंतर पवित्र गंगाजलाने बिरोबा महाराज व इतर देवस्थानांना पाणी घालून विधिवत अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे.
रात्री ८ वाजता आरत्या डफाची मिरवणूक व शोभेचे दारू काम होऊन रात्री १० वा.छबिना मिरवणूक व त्याप्रसंगी फटाक्याची आतिश बाजी होऊन गादी भरण्यात येणार आहे व त्यानंतर पारंपारिक व्ह ईकाचा व नृत्य डफाच्या चालीवर नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वा .हजेरीचा व सायंकाळी ४ वा.कुस्त्याचा जंगी हंगामा भरवण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वा. सह्याद्री निर्मित स्वर संगम आर्केस्ट्रा लावण्याचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे.
तरी यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीचे अण्णासाहेब बेंद्रे ,बबलू म्हस्के, तुकाराम बेंद्रे साहेबराव म्हस्के, दादासाहेब म्हस्के, काकासाहेब म्हस्के ,दौलतराव बेंद्रे ,अमृत मोकाशी, ,शंकरराव बेंद्रे, श्रीकांत शिंदे अनिल बेंद्रे पप्पू बनसोडे राहुल डहाळे मुकेश डहाळे, तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार औताडे प्रकाश बाभळेश्वर यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments