नेवासा( प्रतिनिधी)
हेरंब वसंतराव जोशी . माझा गुणी व अभ्यासू विद्यार्थी . मुलं पदवीधर झाले की नोकरीचा शोध सुरु करतात. हेरंब बी. काॅम. झाला पण नोकरीच्या फंदात न पडण्याचा निश्चय करूनच. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही तरीही काळाची पाऊले ओळखून गुंतवणूक या क्षेत्रात त्याने बत्तीस वर्षांपूर्वी प्रवेश केला. सुरुवातीला एलआयसी, पोस्ट त्यानंतर युटीआय ची त्याने उमेदवारी केली. त्याचा गोड स्वभाव आणि गुंतवणूकदाराला पटवून देण्याची हातोटी यांच्या आधारावर फक्त नेवासाच नाही तर अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे या मोठ्या शहरातूनही त्याने मोठमोठे ग्राहक मिळवले.
पाहता पाहता म्युचुअल फंड, टर्म इंश्योरेन्स, हेल्थ इंश्योरेंस, फिक्स्ड डिपॉजिट, लोन, स्टाॅक ब्रोकिंग या क्षेत्रातही घट्ट पाय रोवले आहेत. गुंतवणूक क्षेत्रातील बहुतेक व्यावसायिक फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करुन व अवास्तव नफ्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करतात. पण हेरंब जोशी मात्र सुरक्षितता आणि विश्वासार्हता याचा विचार करुन आपल्याला योग्य सल्ला देतात. मी गेल्या बत्तीस वर्षांपासून याचा अनुभव घेत आहे . " जिंदगीके साथ भी और जिंदगीके बाद भी " अशी आपली काळजी घेणारी Joshi Finserv ही फर्म आहे . आता हेरंबचा मुलगा चि. अमेय MBA FINANCE झाल्यावर त्याच्या जोडीला उभा राहिला आहे. व्यवसायाचे गोड बाळकडू त्याला उपजतच मिळाले आहे . पुण्यात त्याचे काही कर्मचारी काम करीत आहेतच . आता वर्षप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर नेवासा फाटा परिसरातही त्याने आपली नवीन शाखा सुरु केली आहे . हेरंबची पत्नी सौ. अंजली आणि कन्या अनुष्का यांच्यासह रामेश्वर गोरे, ऋतुजा रोडे, निलेश एरंडे, श्रुती वाबळे यांची टीम अतिशय आत्मियतेने ऑफिस सांभाळतात. जोशी परिवाराने जनसेवेचा घेतलेला वसा अखंड चालू राहून ग्राहकांसह JOSHI FINSERV ची भरभराट होवो ही प्रभूरामचरणी प्रार्थना !
जय श्रीराम ।
आबा मुळे नेवासा
31 मार्च 2025
0 Comments