नवीन शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा, प्रा.डॉ.निलेश गाडेकर-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.24-  नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणामध्ये नवनवीन बदल झालेले आहेत या बदलाला विद्यार्थ्यांनी स्वीकारून अंतर्गत मूल्यमापन व बहिस्थ मूल्यमापन याद्वारे सजनशील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन प्रा.डॉ. निलेश गाडेकर यांनी केले ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे अंतर्गत मूल्यमापन कार्यशाळेत बोलत होते प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास समन्वयक डॉ. प्रमोद पवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. दिलीप बिरुटे,डॉ.भास्कर टेकाळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 एन ए पी 20-20 (ट्वेंटी-ट्वेंटी) चा स्वीकार करून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांनी मूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन व स्किल इन्व्हेस्टमेंट याकरिता नव तंत्रज्ञानाच्या आधारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या तंत्राचा अवलंब करून नवीन शैक्षणिक धोरणाला काळा बरोबर घेऊन जावे व उच्च शिक्षणातील बदलत्या धोरणानुसार मूल्यांकनाची व्याप्ती अंगीकृत करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंतर्गत मूल्यमापना करिता फीड प्रोजेक्ट हेल्थ अवरनेस टुरिझम भारतीय संविधान यावा अशा विविध उपक्रमशील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहणे गरजेचे आहे याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्वक शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत राहावे असे आव्हान त्यांनी केले. याप्रसंगी  संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विक्रम भुतेकर, डॉ. श्रीकृष्ण परिहार, प्रा. उमेश वामने, प्रा. ज्योती स्वामी, डॉ. रमेश औताडे, डॉ. गोविंद वाघमारे, डॉ. सैराज तडवी, डॉ. निलेश गावडे, डॉ. सुशील जावळे यांनी सहकार्य केले.
(डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments