राजुरी वार्ताहार
कु.शर्मिष्ठा बाळासाहेब डोंगरे ( LLM,NET) हिचे नेट परीक्षेत उज्ज्वल यश.
युजीसीने घेतलेल्या नेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
आय.एल.एस.पुणे येथून एल.एल..बी. चे शिक्षण पूर्ण करुन तिने महाराष्ट्र लाॅ काॅलेज ,पवई येथे एल.एल.एम. प्रथम श्रेणीत पूर्ण केली. *मुळ* गाव मांची ता.संगमनेर असून तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले आहे.पुणे
आकाशवाणी,अहिल्या नगर एफ एम.केंद्रवर तिने विविध विषयांवर विचार मांडले आहेत.क्रांतीसिंह नाना पाटील,संत गाडगे महाराज,इत्यादी विषयावर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिले आहेत.तिच्या या यशाबद्दल सामाजिक व प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे,सचिव वनश्रीताई मोरे,आदर्श सरपंच बाळासाहेब ढोले, छायाताई रजपुत,डाॅ शरद दुधाड,सहसचिव संजय गायकवाड,बाळासाहेब गाडेकर, हरिदास शिंदे,पत्रकार आण्णासाहेब साबळे आदींनी अभिनंदन केले.
सहयोगी बातमीदार विजय बोडखे राजुरी)
0 Comments