शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री रामनवमी उत्सव मोठ्या आनंदाने व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार असून या श्रीराम नवमी उत्सव यात्रेच्या अनुषंगाने नियोजन करण्यासंदर्भात नुकतेच शिर्डी येथे ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत यावर्षी श्रीराम नवमी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी दीपकराव वारुळे यांची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो साई संस्थान प्रमाणेच शिर्डी ग्रामस्थांकडून रामनवमीची यात्रा शिर्डीत मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम चे आयोजन केले जाते यावर्षीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी रविवारी ची ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या बैठकीला शिर्डीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शिर्डी श्रीराम नवमी उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्षपदी दीपकराव वारुळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे शिर्डीतून अभिनंदन होत आहे.
0 Comments