युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी रमेश खेमनर तर सचिव सोमनाथ वाघ




राहुरी / प्रतिनिधी : रविवारी २ मार्च २०२५ रोजी यूवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राहुरी तालुका कार्यकारीणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार,  जिल्हा प्रमुख मार्गदर्शक प्रभंजन कनिंगध्वज, जिल्हा विधी सल्लागार दिपकजी मेढे , नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे पा. यांच्या मार्गदर्शना खाली व जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव राजेंद म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरीत संपन्न झाली या प्रसंगी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक उपस्थित होते.

 या बैठकीमध्ये राहुरी तालुका उपाध्यक्षपदी रमेशजी खेमनर, सचिवपदी सोमनाथ वाघ,  तर उत्तर जिल्हा संघटन सचिवपदी रमेशजी जाधव, संघटन सहसचिवपदी राजेंद्र पवार यांची निवड झाल्याचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भोसले व जिल्हा सचिव राजेंद म्हसे यांनी जाहीर केले   
    जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव राजेंद्र म्हसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही फेरबदल करण्यात आले असून जिल्हा संघटक पदी राजेंद्र पवार तर जिल्हा सहसचिव संघटक पदी रमेश जाधव तर राहुरी तालुका उपाध्यक्ष पदी रमेश खेमनर व राहुरी तालुका सचिव पदी सोमनाथ वाघ यांची निवड करण्यात आली असून तसेच काही सदस्य संघटनेमध्ये नव्याने सामील झाले असून त्यांनाही यावेळी सर्वांच्या उपस्थितीत निवडपत्र देण्यात आले.

   प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले म्हणाले पत्रकारांच्या कुठल्याही क्षेत्रातील त्यांच्या अडीअडचणी व समस्या तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार, बातमीचे वृत संकलन करत असताना अनेक अडचणींना पत्रकाराना सामोरे जावे लागते.पत्रकारांच्या समस्या सोडविणे व वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी लढा देणे बरोबरच पत्रकारावरील अन्याय अत्याचार थांबावा यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ कायम तत्पर राहीला आहे. म्हणूनच जिल्हाभरात संघ पोहोचला आहे.
   यावेळी जिल्हा ज्येष्ठ पत्रकार व प्रेस फोटोग्राफर देवराज मन्तोडे, सागर पवार, दिपक गायकवाड यांना तालुका कार्यकारीणीत स्थान देण्यात आले. यावेळी संघटनेचे सदस्य दिपक मकासरे, प्रमोद डफळ, दिनेश गायकवाड, युनूस शेख सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments