सत्कारमुर्ती श्रीमती मिनाक्षी बिराजदार यांचा क्रांती जनहित बहुउद्देशिय विकास संस्थेच्या वतीने सत्कार..



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव   ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2022-23  महाराष्ट्र शासनाच्या वतीने संभाजीनगर विभागातून मिनाक्षी बिराजदार यांना देण्यात आल्याबद्दल त्यांचा क्रांती जनहित बहुउद्देशिय विकास संस्था व अंजनाई गो शाळेच्या वतीने कोषाध्यक्षा सौ. उर्मिला संदीप इंगळे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 मिनाक्षी बिराजदार यांनी गेले पंचवीस वर्षे विविध क्षेत्रात महिला सक्षमीकरण दलित आदिवासी वंचित घटकातील लोकांसाठी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई महाराष्ट्र शासन यांच्यावतीने गौरविण्यात आले होते. यावेळीच दरम्यान या कार्यक्रमास क्रांती जनहित बहुउद्देशिय विकास संस्था आमखेडा व अंजनाई गोशाळा आमखेडा ता.सोयगाव कोषाध्यक्षा उर्मिला इंगळे, संस्थेच्या संचालक रुपाली लोखंडे, मीना गाडेकर,शारदा इंगळे व पद्मा शिंदे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments