सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी,निमखेडी बस निवाऱ्यातील घटना



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.25- उन्हात होरपळून बस थांब्यात विसावा घेतलेल्या एका प्रवाशांचा उष्माघात मुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. दरम्यान उष्माघात मुळे सोयगाव तालुक्यात मार्च महिन्यातच पहिला बळी गेला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे दरम्यान घटनास्थळी सोयगाव पोलिसांनी पंचनामा केला असून सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंपळगाव(हरे) ता. पाचोरा येथील प्रवाशी अमोल दामोदर बावसकर (वय 25) हे निमखेडी बस निवाऱ्यात  सोमवारी दुपारी तीन वाजेपासून बसलेले होते त्यांना उन्हाची होरपळ लागली असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी  सांगितले दरम्यान सोमवारी रात्री ते निमखेडी बस निवाऱ्यात झोपले असता त्यांचा झोपेत च मृत्यू झाला आहे सोमवारी दिवस भर ते उन्हात होरपळून गेल्या ने रात्री त्यांचा मृत्यू झाला दरम्यान मंगळवारी पहाटे आठ वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी जमादार राजू बर्डे,रविंद्र तायडे आदींनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात त्याचेवर शवविच्छेदन करण्यात आले दरम्यान सोयगाव सह परिसरात सोमवारी व मंगळवारी दोन दिवस उष्णतेची लाट पसरली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तालुक्यात मार्च महिन्यात उष्माघात मुळे पहिला बळी गेला आहे मात्र महसूल कडून अद्यापही घटनेचा पंचनामा केलेला नव्हता सदर मृत्यूची माहिती घेऊन शासनाकडे अहवाल पाठविणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments