एकच लक्ष- प्रत्येक शाळेत राज्य पुष्प वृक्ष", जळकी- वसई शाळेत राज्याचे मानचिन्ह व राज्यपुष्प जारूळचे रोपण --



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.23-  महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प व हरीत मान चिन्ह असलेल्या जारूळ - तामन च्या रोपांचे " सिल्लोड  तालुक्यातील विविध शाळेत डॉ. संतोष पाटील यांनी एकच लक्ष, प्रत्येक शाळेत राज्य पुष्प वृक्ष या संकल्पनेने 20 शाळांमध्ये जारूळ - तामन या महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प व हरीत मान चिन्ह असलेल्या वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे. 

आदर्श जि. प. शाळा जळकी- वसई केंद्र येथे ही जारूळची रोपे रोपण करण्यात आले. सदर शाळा ही अजिंठा डोंगर रांगे लगत वसलेली आहे. या शाळेचा परिसर निसर्गरम्य असल्याने व येथे सुंदर बगीचा आकारास येत असून  या बागेस  राज्यपुष्प सन्मान म्हणून "जारूळवन " असे नाव देण्यात आले आहे असे मुख्याध्यापक राधाकृष्ण सिनकर यांनी सांगितलं. जारूळ वर  फुलपाखरांचा व फळं खाण्यासाठी रेड ब्रेस्टेड पॅराकीट , बुलबुल,कस्तुर आदी पक्षांचा राबता असतो. यावेळी मुख्याध्यापक राधाकृष्ण सिनकर,बहुली येथील पर्यावरण प्रेमी भगवान खंबाट, भाऊसाहेब पा. निकोद,शिक्षक प्रमोद पाटील,सुनील खरमाटे, शालेय अध्यक्ष दीपकलाल जैस्वाल, श्रीराम कऱ्हाळे रामेश्वर जेठर,अश्विनी तांदळे, इरफान शहा, प्रभू लांडगे आदी उपस्थिती होते.
(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments