सोयगाव येथे राष्ट्रसंत संत श्री गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगांव दि.23- सोयगांव येथील बसस्थानकाजवळ व क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा कार्यालयात राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान बसस्थानक जवळ राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम यांच्याहस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.

 तर क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांच्याहस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी समाजसेवक दत्तू रोकडे,कडूबा ठाकरे,कृष्णा शिंदे,प्रभाकर नागपुरे,तुकाराम सोनवणे,पत्रकार ईश्वर इंगळे,यासिन बेग,राजू औरंगे,दिलीप शिंदे,अशोक ढगे,अनिल लोखंडे,दिलीप सुरडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, महेश मानकर,राम सोहनी,राहुल सोनवणे,सतीश नेरपगारे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments