टाकळीभान(प्रतिनिधी)— मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असल्याने आध्यात्मिकतेतून ज्ञान प्राप्ती होत असल्याने भावनेपेक्षा ज्ञान महत्वाचे असून ज्ञाना बरोबर आहाराला महत्व असल्याने त्या त्या आहारा नूसार माणूस तसा घडत असतो असा उपदेश विनोद सम्राट ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी येथील शंभो महादेवाच्या प्रांगणात महाशिवरात्री निमित्त आयोजित किर्तनरुपी सेवेतून उपस्थित भाविक भक्तांना केला.
येथील ग्रामदैवत असलेल्या पुरातन शंभो महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी दिड टना पेक्षा जास्त साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटपाचे नियोजन आयोजकांनी केले होते. महाशिवरात्री निमित्त ह.भ.प. ज्ञानेश्व महाराज तांबे यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत जाहीर हरी किर्तन झाले.
यावेळी उपदेश करतांना तांबे महाराज म्हणाले की, माता पार्वतीला आहाराचे महत्व प्राप्त होते. मानवाच्या आहारावर त्याचे संस्कार अवलंबून असतात व आहारानूसार पिढी घडत असते त्यामुळे मुलांना चांगले संस्कारासाठी माता पित्यांनी मुलांना योग्य आहार देवून घडवावे. व मुले फॅशनच्या
नावाखाली तोटके वस्त्र परिधान करतात त्याकडे माता पित्यांनी बारकाईने लक्षदेण्याची गरज असल्याचे
त्यांनी सांगितले.यावेळी हजारो भाविकांनी किर्तन सेवेचा लाभ घेतला.
महाशिवरात्री निमित्त शंभो महादेवाच्या दर्शना
साठी मोठी गर्दी झाली होती त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात भाविकांची सकाळ पासूनच रांगा लागल्या होत्या. किर्तना नंतर लोकवर्गणीतुन सुमारे दिड टन साबुदाना खिचडी व पाचशे किलो केळी नायलॉन चिवड्याचे पाकीटाचा प्रसादाचे वाटप करण्यात आहे. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव यात्रा कमेटी, संत तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त मंडळ, भजनी मंडळ, ताई प्रतिष्ठाण, प्रकाश नाईक मित्र मंडळ, कारभारी चांडे मित्र मंडळ, कान्होबा खंडागळे मित्र मंडळ व पत्रकार दिलीप लोखंडे मित्र मंडळ विषेश परीश्रम घेतले. यावेळी माऊली प्रतिष्ठानचे माऊली मुरकुटे, डाॅ. वंदनाताई मुरकुटे , प्रांताधिकारी किरण सावंत यांनी सपत्नीक दर्शन घेतले. तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments