डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)

जालना जिल्हाध्यक्षपदी किशोर सिरसाठ तर बदनापूर तालुकाध्यक्षपदी सोपान कोळकर
 
छत्रपती संभाजीनगर येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना जालना जिल्हा कार्यकारणी निवडीबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब,राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले,संघटनेचे राज्य समन्वयक इकबाल शेख (अहमदनगर) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

 यावेळी जालना जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षपदी किशोर सिरसाट तर बदनापूर तालुकाध्यक्षपदी सोपान कोळकर यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्याही निवड करण्यात आल्या आहेत.
जालना जिल्हा सचिव आनंद इंदानी,
 उपाध्यक्ष अमोल राऊत, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक खरात,तर  
जिल्हा कार्यकारणी सदस्य सिद्धेश शेळके,आदिल खान, राम ढाकणे,नारायण ब्राह्मणे, संजय भुजाळ,गजानन घनगाव,
तर यावेळी बदनापुर तालुका उपाध्यक्षपदी सर्जेराव भिसे,या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.संघटनेतील प्रत्येकाने संघटना वाढीसाठी योगदान द्यावे असेही ते म्हणाले.मराठवाड्यामध्ये डिजिटल मीडिया पत्रकार संघटना सर्व स्तरावरील डिजिटल मीडियातील पत्रकारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी कायम सोबत असेल असे आश्वासन दिले.
प्रसंगी राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांनी संघटनेच्या रूपरेषा स्पष्ट केली व राज्य समन्वयक इकबाल सर यांनी संघटनेचे ध्येय धोरण सागितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव आनंद इंदानी यांनी तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष किशोर सिरसाठ यांनी केले होते.आभार रमेश नेटके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments