जीवनात चढ-उतार येतात. या चढउतारातून मार्ग मिळू दे अडचणींचा सामना करण्याची शक्ती दे! अशी साईचरणी केली प्रार्थना-- माजी खासदार प्रिया दत्त

शिर्डी (प्रतिनिधी) जीवनात अनेक चढउतार येतात. या अडचणींचा सामना करण्याची शक्ती साईबाबांकडून मिळावी एवढीच साई चरणी प्रार्थना केली आहे. असे माजी खासदार प्रिया दत्त यांनी शिर्डीत सांगितले.
माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं.


 साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना प्रिया दत्त यांचे डोळे पाणावले. यावर बोलताना प्रिया दत्त यांनी म्हटलं, "माझी आई अभिनेत्री नर्गीस दत्त‌ ही साईबाबांची परमभक्त होती. ती आजारी असतानाही शिर्डीला येत असे. आज शिर्डीत येवून साईंचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. आम्ही जीवनात अनेक चढ-उतार बघितले. मात्र, आपल्यात ती ताकद हवी. साईंचा आशीर्वाद असला तर नक्कीच चांगलं होतं. साईंकडे मी तेच मागितलं आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर मी प्रत्येकवेळी काहीच मागत नाही. जीवनात अनेक चढ-उतार येतात. या अडचणींचा सामना करण्याची शक्ती साईबाबांकडून मिळावी, एवढीच प्रार्थना साईचरणी केली आहे," असं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. पुढे प्रिया दत्त यांनी, आपण साईबाबांचं दर्शन घेवून मंदिराबाहेर आल्यानंतर भाऊ संजय दत्त आणि आम्ही दोघी बहिणींनी एकत्रित साईंच्या दर्शनासाठी यावं असा विचार मनात आल्याचं सांगितल . साईबाबांचं बोलवणं आलं तर लवकरच आम्ही तिघे भाऊ-बहीण एकत्र साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments