भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन! साई संस्थांनच्या वतीने करण्यात आला सत्कार!

शिर्डी ( प्रतिनिधी)भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी आठ जानेवारीला शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.  साईदर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.


सूर्यकुमार यादव हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज  आहे. त्याचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे असून चाहते त्याला प्रेमाने ‘स्काय’ असे म्हणतात. तो मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो. तो क्रिकेटच्या त्यांमध्ये लोकप्रसिद्ध असा खेळाडू आहे.त्याने १४ मार्च २०२१ रोजी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याला टी-२० स्पेशालिस्ट असेही म्हटले जाते.२०१२ मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. तो आज एक प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. तो शिर्डीत आल्याचे क्रिकेटच्या चाहत्यांना कळताच त्याला पाहण्यासाठी क्रिकेटच्या चाहत्यांनी संस्थान प्रवेशद्वारा जवळ मोठी गर्दी केली होती. मंदिरात साई भक्तांनी ही आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूला पाहताच हात हलवून अभिवादन केले .

Post a Comment

0 Comments