धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दत्तूभाऊ रोकडे हे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.०८ - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांच्याकडून दिला जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सोयगाव येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दत्तू रोकडे,अरुण सोहनी,डिगांबर वाघ,विष्णू मापारी व संजय बोरसे यांना सन्मानित करण्यात आले. 

    सोयगाव येथील दत्तू रोकडे यांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्र, कृषी क्षेत्र अरुण सोहनी,आरोग्य क्षेत्र डिगांबर वाघ व संजय बोरसे, लोककला क्षेत्र विष्णू मापारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांनी घेतली. संस्थेकडून  सन २०२५ चा दिला जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला होता. पत्रकार दिनानिमित्त होरायझन अकॅडमी सी.बी.एस. सी.स्कुल सभागृह नाशिक येथे झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार,गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण, डॉ.महेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी दत्तू रोकडे,अरुण सोहनी,डीगांबर वाघ,संजय बोरसे,विष्णू मापारी यांना मॉडेल व मिसेस मलेशिया ज्योती केदारे-शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सोयगाव येथील मान्यवरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम, शाम पाटील,शामराव आढाव,विजय गव्हाड,मुरलीधर बागले, राम सोहनी,महेश मानकर,राजू औरंगे,रामा फुसे,अमोल कायस्थ, राजू भवर, सुनील निकम,संदीप इंगळे,दिलीप सुरडकर व गयास पठाण आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments