शेतकरी बांधवांनी पिकांसाठी जास्तीत जास्त दर्जेदार सिंगल सुपर फॉस्फेट चा वापर करावा- कार्यकारी संचालक मनोज छेडा-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.१२- शेतातील मातीची सुपीकता कायम  टिकून राहावी व उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधवांनी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा जास्तीत जास्त वापर करावा त्यासाठी केंद्र सरकारही  विविध स्तरावर उपाययोजना करीत आहे असे आवाहन आरती इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक मनोज छेडा यांनी संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या विक्रेता बंधूंच्या संमेलनात केले .


यावेळी मितेश गांगर (उपाध्यक्ष विपणन) यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनील पाटील (राष्ट्रीय विपणन व्यवस्थापक) यांनी केले डी.ए.पी. खताला पर्याय सिंगल सुपर फॉस्फेट खत आहे त्यासाठी विक्रेते बांधवांनी शेतकऱ्यांना दर्जेदार सिंगल सुपर फॉस्फेट खत उपलब्ध करून द्यावे असे आवाहन यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन सरिगला यांनी केले तर आभार अमोल गोडंबे यांनी मानले
या स्नेहसंमेलनाला राज्यातील नामांकित खत विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments