रामपुर (अनाप सोपान)

राहुरी तालुक्यातील रामपूर लक्ष्मीवाडी परीसरात राहणार्‍या हरिश्चंद्र मोहना पठारे या शेतकर्‍याच्या गोठ्यातील 3 शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
1 बोकड फस्त तर 1 शेळी जागीच ठार आणि 1 शेळी जखमी अश्या एकूण तीन पशुधनाची 50 हजार रुपये नुकसान पठारे कुटुंबाचे झालेले आहे
गावात बिबट्या ही काय नवीन बाब नाही कुणाच्या शेळ्या कुणाची कुत्रे तर कुणाच्या कालवडींवर कायमच बिबट्याचे हल्ले होत राहतात
परंतु बिबट्या जेरबंद व्हावा म्हणून गाव स्तरावर कुठलाही प्रयत्न केला जात नाही
गावात किव्वा शिवारात 1 नर बिबट्या 1 मादी व 2 पिल्ले असे तब्बल 4 बिबटे शेतात काम करताना अनेकांना दिसून येत आहे
गेल्या 10 वर्षात गावात एक पण बिबट्या जेरबंद झालेला नाही दिवसेंदिवस गावात बिबट्याचा वावर वाढतच चालला असून
समस्त ग्रामस्थ रामपूर हे बिबटे लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी करत आहे
गाव स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर हे बिबटे जेरबंद करून शेतकरी ग्रामस्थांना दिलासा द्यावा ही विनंती.

(आजपासून रात्री 11 ते सकाळी 7 असा शेतीसाठी वीजपुरवठा आहे आणि त्यातच काल बिबट्याने घातलेल्या थैमानामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत .

Post a Comment

0 Comments