दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.१२- तीन वर्षांपूर्वी ज्या जामनेर तालुक्यातील गोद्री ते सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या अजिंठा डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यास मंजुरी मिळाली त्या रस्त्यास वन विभागाची परवानगी चं नसल्याचे कळते. कोणतेही पत्र संबंधित वनपाल, वन रक्षक, जामनेर यांना नसतांना मागील महिन्यात 4500 मोठ्या आकाराच्या , भारतीय प्रजातीच्या झाडांना तोडण्या साठी मार्किंग केली आहे.
दोन वर्षांपूर्वी वृक्ष संवर्धक व पर्यावरण संरक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ. संतोष पाटील, भूषण कानडजे, भाऊसाहेब पाटील, राहुल मुळे व गोद्री च्या इतर तरुणांनी चिपको आंदोलन करून व तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडे कर यांना या वृक्ष, डोंगर, रस्त्याची नसलेली गरज, झाडे न तोडता पर्यायी रस्ता याबाबत कळविले होते.राष्ट्रीय हरीत लवाद ( एन जी टी ) कडे ही याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला होता. त्यामुळे प्रादेशिक वनविभाग, धुळे व जळगाव यांनी 2 वर्ष पासुन हे वृक्ष तोड थांबविली आहे. मात्र मागील महिन्यात 4500 झाडांवर मार्किंग करण्यात आली
आहे. "काय अट घातली आहे"- वनविभागाची झाडे तोडण्यासाठी - केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने राज्याच्या वन व महसूल विभाग सचिव, मंत्रालय, मुंबई यांना 14/03/ 2014 रोजी पत्र दिले की आधी पर्यायी ठिकाणी झाडे लावा व मगच झाडे तोडा अशी अट टाकत परवानगी मिळेल. जामनेर वनक्षेत्रातील झाडे तोडून त्या बदल्यात सोयगाव तालुक्यातील निंमखेडी येथे गट न -40 मध्ये तितकी झाडे लावावी व 3 वर्षे वाढली की मग ही झाडे तोडावी ही शर्थ व आवश्यक अट यात आहे. मात्र हा निर्णय 2014 चा आहे. नवीन नियमानुसार जितकी झाडे तोडणार त्याच्या 3 पट झाडे लावून ती 3 वर्ष वाढवावी असा नियम आहे, म्हणजे चं 14 हजार झाडे लावून ती 3 वर्ष वाढीस लावावी.मात्र सोयगाव च्या निमखेडी येथे असे एक ही झाडं लावण्यात आलेले नाही. अत्यंत गंभीर असा हा प्रकार जामनेर व सोयगाव प्रादेशिक वन विभाग हे करत आहे. या भागाचे वाळवंट झाले तर मोठे दुष्परिणाम होऊन वन्यजीवन धोक्यात येईल असे पर्यावरण प्रेमी जनता खडखद व्यक्त करत आहे.जंगलातून जिथून रस्ता 4 किमी रस्ता हा या राखीव वनक्षेत्रातून जातो. जिथून रस्ता जाईल त्या लगत वन्यजीवांना पाणी मिळावे म्हणून वनातलाव बांधावे मात्र असे एक ही वनातलाव अस्तित्वात चं नाही.हजारो सागवान व इतर झाडे तोडनेचा खटाटोप सुरु आहे. यासाठी जामनेर येथील वनरक्षक, नाकेदार मदत करत आहे व लाकूड व्यापारी घाई करत आहेत की लवकरात लवकर झाडे तोडून ती आम्हास द्यावी. ही झाडे विकून 4 ते 5 कोटी ची कमाई खिशात घालणे चा हा डाव आहे अशी चर्चा जामनेर व सोयगाव तालुक्यात रंगली आहे.वनविभाग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments