बाभळेश्वर येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी




बाभळेश्वर(वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती माहिती अधिकार संघर्ष समिती व समस्थ बाभळेश्वर ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

  यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी संपूर्ण विश्वाला नवसंजीवनी देणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना दिली. जिजाऊ मा साहेब ह्या संपूर्ण समाजाच्या प्रेरणास्थान आहेत.
           यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तुकाराम बेंद्रे हे अध्यक्षस्थानी होते. तर जेष्ठ विधीतज्ञ भास्कर पठारे, रयतचे विभागीय निरीक्षक प्रमोद तोरणे, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन अनिल म्हस्के, ह.भ.प.गोकुळ बेंद्रे,   ज्ञानदेव लहानू बेंद्रे, दादासाहेब बेंद्रे, आर.डी.कदम, लातूर पॅटर्ण चे बापू भोसले, शिवसेनेचे भाऊसाहेब मोरे, वैजनाथ भालेराव, संजय कोकाटे, प्रकाश बागुल, राहुल हुंडेकरी, राजू कोकाटे, रमेश दळे, सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळाचे सुहास बेंद्रे, शंकर रोकडे, किरण पंडित, जावेद शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
                 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments