दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव.दि.25- संपूर्ण भारतात एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे असे खासदार कल्याण काळे यांनी सोयगाव येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले
अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 40 नागरिकांनी रक्तदान केले शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात खासदार कल्याण काळे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे उपस्थित होते. तालुका केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेचे अध्यक्ष संजय शहापूरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलताना खासदार कल्याण काळे यांनी सांगितले की गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अनेक सामाजिक उपक्रम मी पाहिले आहे तसेच सोयगाव सारख्या दुर्गम भागात संजय शहापूरकर हे कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असून लवकरच सोयगाव तालुका उपोषण मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी तालुकाप्रमुख (उबाठा) दिलीप मचे, रविंद्र काळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, राष्ट्रवादी (एसपी) तालुकाध्यक्ष डॉ इंद्रजीत सोळुंके, दिनेश पंडित, विकास मंडवे, अमोल पाखरे, मंगेश सोहनी,शोमराज चौधरी, गोपाल जाधव शोहेब देशमुख सईद देशमुख मयूर राऊत रवींद्र जाधव, गणेश जाधव, विनोद अरुण सोनी,सचिन चोपडे, दिगंबर वाघ,विष्णू मापारी यांच्यासह अमृता रक्तपेढीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
0 Comments