टाकळीभान ग्रामपंचायतने प्लास्टिक व कागदी चहाच्या ग्लास वर बंदी

टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान ग्रामपंचायतने कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहा हॉटेल व्यवसायिकांनी प्लास्टिकचे अथवा कागदी  कप त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्रक  उपसरपंच कान्हा खंडागळे व ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांनी चहा व्यवसायिकांना दिले आहे.


          टाकळीभान ग्रामपंचायती मध्ये चहा व्यवसायिकांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 
          परिपत्रकात नमूद केले आहे की चहाचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते.त्या अनुषंगाने ग्रा.पं. कार्यालयात आपण सर्व हॉटेल व्यावसायिकांसोबत यावर चर्चा करण्यासाठी दि.०६/०१/२०२५ रोजी बैठक आयोजित केली होती. आपले बैठकीत ठरले प्रमाणे दि.१४/०१/२०२५ रोजी मकरसंक्राती पासून आपले टाकळीभान गावामध्ये आरोग्यास घातक असणारे कागदी कप । प्लास्टिक कप वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.

               त्यासाठी खालीलप्रमाणे नियमावली तयार करण्यात आलेली आहे.आपले टाकळीभान गावातील चहा विक्रेते यांचेकडे कागदी कप । प्लास्टिक कप आढळून आल्यास पहिल्यावेळेस ५००/- रु, दुसऱ्या वेळेस पुन्हा आढळल्यास १०००/- रु, तिसऱ्या वेळेस १५००/- रु. या प्रमाणे दंड रकमेमध्ये वाढ केली जाईल. तसेच वारंवार आपणाकडून या आदेशाची पायमल्ली होत असल्यास आपला व्यवसाय ग्रा.पं. कडून परवाना रद्द करण्यात येईल. गावातील सर्व चहा विक्रेते यांनी आपल्या दुकानातच नव्हे तर बाहेर चहाच्या घर पोहच साठी सुद्धा कागदी कप / प्लास्टिक कप वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व चहा विक्रेते यांनी घर पोहोच सेवा देत असतांना चहा शौकीन यांचे साठी स्वः खर्चाने जसे कि, व्यावसायिक व्यापारी, बँका, शाळा, पतसंस्था, शासकीय कार्यालय आदि. ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी काचेचे ग्लास पुरवावे. तसेच चहा पिणाऱ्यांनी कागदी कप / प्लास्टिक कप यामधून चहा पिण्याचे टाळावे. व चहा विक्रेतेला झालेल्या ठरावाबाबत अवगत करावे. सदर कागदी कप / प्लास्टिक कप बंदी ही चहा विक्रेते व चहा पिणारे शौकीन यांचे आरोग्यसाठी गरजेचे असून याबाबतची अंमलबजावणी करणे दोघांचे आद्य कर्तव्य आहे.तरी आपले व आपल्या गावाच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी वरील नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहनही  उपसरपंच कान्हा  खंडागळे, व ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.

Post a Comment

0 Comments